Assets under SARFAESI Act
Assets under SARFAESI Act Read More »
We are pleased to announce the publication of the annual report for financial year 2022-23.
Direct Download in PDF | Go to Resources Page for more documents.
Annual Report for FY2022-23 Released Read More »
सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनींनो,
आपल्या बँकेचा दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाचा वैधानिक लेखापरिक्षकांनी तपासलेले ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, आपणासमोर संचालक मंडळाच्या वतीने सादर करीत आहे.
यावर्षी आपला कर पूर्व नफा ₹168.16 लाख झाला आहे. तसेच करोत्तर नफा ₹117.16 लाख झाला आहे. आपले भाग भांडवल ₹427.21 लाखावरून ₹424.94 लाखापर्यंत वाढले आहे. आपले स्वनिधी ₹ 1,773.62 लाखावरून ₹1,835.96 लाखापर्यंत आहेत. तसेच आपल्या बँकेचे भागभांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सी.आर.ए.आर.) हे 20.58% झाले असून रिझव्र्ह बँकेने निर्धारित केलेल्या 9% CRAR (सी.आर.ए.आर.)पेक्षा बरेच अधिक आहे आणि म्हणूनच आपल्या सभासदांनी आपल्या बँकेच्या वित्तीय मजबूतीविषयी निश्चित रहावे. आपण सर्व भागधारक, ग्राहक, ठेवीदार यांचा विश्वास आणि दिलेले सहकार्यामुळे आपण आपल्या बँकेची प्रगती कायम ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आपल्या बँकेने अहवाल साली सर्वांगीण आर्थिक प्रगती केलेली आहे.
सभासद व भाग भांडवल:
अहवाल सालाचे आरंभी बँकेच्या भागधारक सभासदांची संख्या 15040 एवढी होती अहवाल सालामध्ये 192 नविन सभासद झाले असून 94 सभासदांनी सभासदत्त्वाचा राजीनामा दिल्याने 31 मार्च 2021 अखेर सभासद संख्या 15138 एवढी आहे. बँकेचे वसुल भाग भांडवल रू. 424.94 लाख आहे. सभासद नसलेल्या ग्राहकांची नैमितीक गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना नाममात्र सभासदत्व दिले जाते. असे सभासदत्व देऊन ग्राहकांची तात्पूरती गरज पूर्ण करणे हाच यामागील उद्देश.
राखीव निधी व इतर निधी:
राखीव निधी व इतर निधी हे बँकेची सुरक्षितता व सक्षमता याचे प्रतिक आहे. यावर बँकचे स्थैर्य अवलंबून असते. हे निधी जेवढे जास्त तेवढे बँकेचा पाया मजबूत. अहवाल सालांत बँकेची राखीव व इतर निधी रू. 2680.43 लाख आहे.
ठेवी:
ग्राहक सेवा व व्याजदराच्या स्पर्धेला सामोरे जावून ठेव वाढीवा वेग कायम ठेवणे हे कठीण आहे. 31 मार्च 2020 अखेर ठेवी रू. 12059.56 लाख होत्या. त्या 31 मार्च 2021 अखेर ठेवी रू. 12586.11 लाख इतक्या झालेल्या आहेत. गतवर्षापेक्षा रू. 526.55 लाख इतकी वाढ झालेली आहे.
कर्जे:
रिझव्र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी, व्यवसायाच्या भरभराटीसाठी, लहान व्यापारी स्वयंरोजगार, वाहन खरेदी, घरबांधणी, शेती पुरक उद्योग, सोने-तारण, पगारदार कर्मचाÚयांच्या गरजा भागविण्यासाठी बँक योग्य ते तारण घ्¨ऊन व परत फेडीची क्षमता पाहून कर्ज पुरवठा करते. रिझव्र्ह बँकेच्या सुचनांनुसार बँकेने अहवाल वर्षात अग्रक्रम क्ष्¨त्रातील एकूण 83.47ः कर्ज पुरवठा केला आहे.
खेळते भांडवल:
गतवर्षी बँकेचे खेळते भांडवल रू. 15747.32 लाख होते. दि.31 मार्च 2021 अखेर रू. 16412.03 लाख इतके झाले आहे.
कर्ज वसुली व थकबाकी:
बँकांच्या बाबतीत कर्जाची नियमित वसुली हा सर्वात महत्वाचा घटक असतो. आज तीन महिने कर्ज हप्ता किंवा व्याज आले नाही तर ते खाते एन.पी.ए. मानून त्याचे व्याज उत्पन्नात धरता येत नाही आणि त्याचा परिणाम बँकेच्या नफ्यावर होतो. बँकींग व्यवसायामध्ये अनुत्पादक कर्जे म्हणजेच एन.पी.ए. यांचे प्रमाण अत्यल्प राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी झाल्यास अशी कर्जे अनुत्पादित गणली जाऊन, याचा प्रत्यक्ष नफ्यावर परिणाम होतो. अशा कर्जाच्या प्रमाणावरच बँकांचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असते. बँकेचे वसूली अधिकारी तसेच अधिकारी वर्ग कर्मचाÚयांसह कर्जदारांना प्रत्यक्ष भेटणे, पत्रव्यवहार करणे, दावे दाखल करणे इत्यादी आवश्यक ते सर्व उपाय योजत असतात, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येते ते आपल्या म्हणजेच कर्जदार व जामीनदार यांच्या सहकार्याने. कर्जदारांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे व वेळेत भरून भकबाकीचे प्रमाण अत्यल्प राखण्यास बँकेस सहकार्य करावे ही अपेक्षा आहे. कर्जदार सभासदांनी कर्ज वेळेवर भरावे आणि कारवाईचा कटू प्रसंग टाळावा अशी मी या निमित्ताने अपेक्षा करतो.
भांडवल पर्याप्तता:
बँकिंग व्यवसायाला स्थैर्य येण्यासाठी भारतीय रिझव्र्ह बँकेने भांडवल पर्याप्तता निकष लागू केलेले आहेत. रिझव्र्ह बँकेच्या किमान 9% निकषाच्या तुलनेत बँकेची भांडवल पर्याप्तता अहवाल साली 20.58% इतकी आहे. भांडवल पर्याप्तता योग्य राखल्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आणि समाधानकारक असल्याचे दिसून येते.
सभासद कल्याण निधी:
बँकेच्या सभासदांच्या हितासाठी बँक कटिबध्द आहे. सभासदांच्या अडचणीत बँक आर्थिक सहाय्य करीत असते. बँकेने सभासदांना केलेली मदत ही सभासदांच्या वेगवेगळया प्रकारच्या आजारासाठी व शस्त्रक्रियांसाठी सभासद कल्याण निधीच्या नियमानूसार आर्थिक स्वरूपात केली जाते.
नेटवर्थ:
बँकेचे दिनांक 31/03/2021 अखेर नेटवर्थ ₹ 2,095.96 लाख आहे. स्वनिधी वाढविण्यासाठी बँक नफा वाढविण्यावर अधिक भर देत आहे.
गुंतवणूक:
आपल्या बँकेच्या गुंतवणूक कशा असाव्यात याबद्दल दिशादर्शन करणारे धोरण बँकेने आखले आहे. त्यानुसारच वर्षभरातील गुंतवणूकांचे व्यवहार होत असतात. आपल्या सर्व गुंतवणूका पूर्णतः सुरक्षित आहेत व त्यावरील उत्पन्न बँकेस नियमितपणे मिळत आहे.
वैधानिक लेखा परिक्षण:
आपल्या बँकेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी मे. खरे देशमुख अँण्ड कं. पुणे या चार्टर्ड अकौटंट कंपनीची नेमणूक केली होती. बँकेच्या एकंँकेच्या एकंदरीत कामकाजाबद्दल आपल्या लेखापरिक्षण अहवालात त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या बँकेला ‘‘अ’’ वर्ग मिळाला आहे.
सरकारी मुद्रांक फ्रँकिंग सेवा:
आपली बँक मुख्य शाखेमध्ये दस्तऐवज फ्रँकिंगची सुविधा देत आहे.
पर्सनलाईज्ड चेकबुक:
बँकेच्या मुख्य कार्यालयांत पर्सनलाईज्ड चेकबुक सुविधा सुरू करण्यात आली आहे. सदर सुविधेमार्फत बँकेच्या सर्व शाखांमधील खातेदरांना त्यांचे स्वतःचे नांव, खाते नंबर चेक बुकवर छापून चेक बुक त्वरित देण्यांत येत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान:
बँकेच्या ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देता यावी या हेतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बँकेने केला आहे. कोअर बँकिंग सोबतच एनी ब्रँच बँकिंग बँकेच्या सर्वच्या सर्व शाखा मुख्य कार्यालयाशी कोअर बँकिंग प्रणालीने जोडलेल्या आहेत. त्यामुळे खातेदारांना आपल्या खात्यावरील व्यवहार बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्वरित करणे सहज शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे इतर बँकेशी टाय-अप करून ग्राहकांना आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी. ची सुविधा उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर बँकेने एस.एम.एस. बँकिंग सेवा सुरू केली असून खातेदारांना त्यांच्या खात्यात व्यवहार केल्यावर खात्याचा बॅलेन्स, चेक रिटन्र्सची मुदत ठेव पावती नुतनीकरणाची माहिती एस.एम.एस. द्वारे त्वरीत उपलब्ध होत आहे. सदर सुविधेसाठी बँकेतून फाॅर्म भरणे आवश्यक आहे.
रिजर्व बँकेचे अधिकारी, स्थानिक बँकांचे अधिकारी, सहकार खाते, मा. विभागीय सहनिबंधक, कोकण विभाग, मा. जिल्हा उपनिबंधक, राज्य सहकारी बँक लि., मुंबई, जिल्हा मध्यवर्ती बँक लि. डहाणू, मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था डहाणू, वैधानिक लेखापरीक्षक, पुणे, सनदी लेखापाल, तसेच अंतर्गत तपासनीस बँकेच्या पॅनलवर असलेले अॅडव्होकेट यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार. तसेच संचालक मंडळाने त्यांच्या कालावधीत बँकेच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवून व्यवस्थितरित्या बँकेचे दैनंदिन कामकाज सांभाळले त्या सहकार्याबद्दल आभार.
त्याचप्रमाणे कोकण नागरी सहकारी बँक्स, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स, महाराष्ट्र अर्बन काॅ-ऑप. बँक्स फेडरेशन चे पदाधिकारी, सहकार भारती, यांचे मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.
बँकेच्या दैनंदिन कामकाजात अधिकारी वर्ग व कर्मचारी बंधु-भगिनी व पिग्मी एंजट हयांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच अनेक व्यक्ती व संस्थांनी या बँकेला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले त्यांचाही मी आभारी आहे.
बँकेच्या प्रगतीसाठी आपणा सर्वांचे असेच सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करून हा अहवाल पूर्ण करतो.
जय हिंद ! जय सहकार !!
— श्री. मिहिर चंद्रकांत शाह
अध्यक्ष, डहाणू रोड जनता सहकारी बँक
A message from the Chairman Read More »
We are pleased to announce the publication of the annual report for financial year 2020-21.
Direct Download in PDF | Go to Resources Page for more documents.
Annual Report FY 2020-21 Released Read More »