कर्जदार, जामिनदार यांना विनम्र आवाहन

सर्व कर्जदार व जामिनदार, ग्राहकांना विनंती करणेत येते की, आपण आपले कर्ज खाते NPA होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले खाते थकीत झालेस, कर्जदार व जामिनदारांच्या कर्ज खात्याची माहिती बँकेमार्फत Credit Information Company जसे की, सीबील यांचेकडे पाठविली जाते. त्यामुळे त्यांचा सिबिल score कमी होतोच, शिवाय पतमुल्यांकन ही कमी होते. आपले खाते एकदा NPA झालेस थकबाकीची पुर्ण रक्कम भरल्याशिवाय, म्हणजेच शून्य झाल्याशिवाय कर्ज खाते NPA मधून बाहेर पडणार नाही, त्यामुळे कोणतीही आर्थिक संस्था आपणास अर्थसहाय्य करणार नाही.

तरी सर्व कर्जदार/जामिनदार/ग्राहकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, आपली कर्ज खाती नियमित ठेवून बँकेस सहकार्य करावे.