announcements

८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटिस

सभासदांस कळविण्यात यते की, बँकेची 87 वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार, दिनांक 29/09/2024 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री दशाश्री माळी वाणिक समाज हाॅल मसोली, डहाणू रोड येथील सभागृहात आयोजीत केली आहे. सदर सभेत खाली नमूद केलेल्या विषयावंर विचार करण्यांत येईल. तरी सर्व सभासदांनी वळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

सभे पुढील विषय

  1. मागील दिनांक 16/09/2023 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे
  2. दिनांक 31 मार्च 2024 अखेर संचालक मंडळाचा वार्षिक अहवाल, लेखापरिक्षेत ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजूर करणे व वैधानिक लेखा परिक्षकांच्या अहवालाची नोंद घेणे.
  3. संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार सन 2023-2024 या वर्षाच्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
  4. आर्थि क वर्ष सन 2024-2025 या सालासाठी वैधानिक व अतंर्गत लेखापरिक्षकाची नियुक्ती करणे बाबत.
  5. सन 2024-2025 साठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.
  6. सन 2022-2023 या वर्षाच्या वैधानिक लेखापरिक्षण दोष दुरूस्ती अहवालाची नोंद घेणे.
  7. महाराष्ट्र षासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजने अतं र्गत केलेल्या कर्जखात्यांची नोंद घेणे.
  8. बँकेच्या उपविधी (Bye Laws) नुसार रू. 1000/- व अधिक रक्कमेचे भाग असलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार देणे बाबत
  9. बँकेची पूर्व शाखा आषागड येथे स्थलांतर केली असल्याने पूर्व शाखेची जागा विक्री करणे बाबत विचार करणे.
  10. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूकीबाबत.
  11. हया वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे
  12. मा. अध्यक्ष यांचे पूर्वपरवानगीने आयत्या वेळी येणार्या विषयांचा विचार करणे.

मा. संचालक मंडळाच्या आदेषावरून
सुनिल चोपडे
वरिष्ठ व्यवस्थापक

सभासदांस सुचना

  1. गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास वरील सभा त्याच ठिकाणी त्याच दिवषी अध्र्या तासानंतर उपरोक्त विषयांसाठी होईल. त्या सभेस गणसंख्येचे बंधन असणार नाही.
  2. वार्षिक सर्वसाधारण सभेतील विषयांच्या बाबत ज्या सभासदांचे काही प्रष्न वा सूचना असतील तर त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सात दिवस आधी कार्यालयीन वेळेत बँकेच्या मुख्य कार्यालयांत लेखी स्वरूपात कळवावे.
  3. तपशीलवार अहवालाच्या प्रती, बँकेच्या मुख्य कार्यालयात व शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत.
  4. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या वेबसाईट dahanujanatabank.com वर प्रसारित केली आहे.

८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटिस Read More »

NPA Warning

कर्जदार, जामिनदार यांना विनम्र आवाहन

सर्व कर्जदार व जामिनदार, ग्राहकांना विनंती करणेत येते की, आपण आपले कर्ज खाते NPA होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले खाते थकीत झालेस, कर्जदार व जामिनदारांच्या कर्ज खात्याची माहिती बँकेमार्फत Credit Information Company जसे की, सीबील यांचेकडे पाठविली जाते. त्यामुळे त्यांचा सिबिल score कमी होतोच, शिवाय पतमुल्यांकन ही कमी होते. आपले खाते एकदा NPA झालेस थकबाकीची पुर्ण रक्कम भरल्याशिवाय, म्हणजेच शून्य झाल्याशिवाय कर्ज खाते NPA मधून बाहेर पडणार नाही, त्यामुळे कोणतीही आर्थिक संस्था आपणास अर्थसहाय्य करणार नाही.

तरी सर्व कर्जदार/जामिनदार/ग्राहकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, आपली कर्ज खाती नियमित ठेवून बँकेस सहकार्य करावे.

NPA Warning Read More »

86 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

सभासदांस कळविण्यात येते कि, बँकेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक १६/०९/२०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता श्री. दशाश्री माळी वाणिक समाज हॉल, मसोली, डहाणू रोड येथील सभागृहात आयोजित केली आहे. सादर सभेत खाली नमूद केलेल्या विषयांवर विचार करण्यात येईल. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, हि विनंती.

सभेपुढील विषय

  • मागील दिनांक २५/०९/२०२२ रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
  • दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर संचालक मंडळाचा वार्षिक अहवाल, लेखापरीक्षेत ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजूर करणे व वैधानिक लेख परीक्षकांच्या अहवालाची नोंद घेणे.
  • संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन २०२२-२३ च्या नफा विभागणीस मंजुरी देणे.
  • आर्थिक वर्ष सन २०२३-२४ साठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाज पत्रकास मंजुरी देणे.
  • सन २०२१-२२ या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण दोषदुरूस्ती अहवालाची नोंद घेणे.
  • महाराष्ट्र शासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत केलेल्या कर्जखात्यांची नोंद घेणे.
  • बँकेने तयार केलेल्या स्टेफिन्ग पॅटर्नला मान्यता देणे.
  • बँकेच्या संचालक मंडळाने सुचविलेल्या पोट-नियम दुरुस्तीस स्वीकार करणे व मंजुरी देणे.
  • ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे.
  • मा. अध्यक्ष यांचे पूर्वपरवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून
— सुनील चोपडे
वरिष्ठ व्यवस्थापक

ठिकाण: मुख्य कार्यालय, डहाणू रोड
दिनांक: २६/०७/२०२३

सभासदांस सूचना

  • गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास वरील सभा त्याच ठिकाणी, त्याच दिवशी अर्ध्या तासानंतर उपरोक्त विषयांसाठी होईल. त्या सभेस गणसंख्येचे बंधन असणार नाही.
  • वार्षिक सर्वसाधारण सभेतील विषयांच्या बाबत ज्या सभासदांचे काही प्रश्न वा सूचना असतील तर त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सात दिवस आधी कार्यालयीन वेळेत बँकेच्या मुख्य-कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे .
  • तपशीलवार अहवालाच्या प्रती, बँकेच्या मुख्य कार्यालयात व शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत.
  • वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या वेबसाईट www.dahanujanatabank.com वर प्रसारित केली आहे.

86 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस Read More »