सभासदांस कळविण्यात येते की, बँकेची 89 वी वार्षिक सर्व साधारण सभा बुधवार, दिनांक ३०/०९/२०२६ रोजी दुपारी 3.00 वाजता श्री दशाश्री माळी वाणिक समाज हाॅल, मसोली, डहाणू रोड येथील सभागृहात आयोजीत केली आहे. सदर सभेत खाली नमूद केलेल्या विषयावंर विचार करण्यांत येईल. तरी सर्व सभासदांनी वळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.
सभे पुढील विषय
- मागील दिनांक २४/०९/२०२५ रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- दिनांक 31 मार्च 2026 अखेर संचालक मंडळाचा वार्षिक अहवाल, लेखापरिक्षीत ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजूर करणे व वैधानिक लेखा परिक्षकांच्या अहवालाची नोंद घेणे.
- संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार सन 2025 -2026 वर्षाच्या नफा विभागणीस मंजूरी देणे व लाभांश देणे.
- आर्थिक वर्ष सन २०२६ -२०२७ या सालासाठी वैधानिक व अंतर्गत लेखापरिक्षकाची नियुक्ती करणेबाबत.
- सन 2026-2027 साठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.
- सन 2024-2025 या वर्षाच्या वैधानिक लेखापरिक्षण दोष दुरूस्ती अहवालाची नोंद घेणे.
- बँकेकडून कर्ज घेणार्यांना शेअर लिंकिंगच्या टक्केवारीमध्ये सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास मंजूरी देणे.
- हया वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे
- मा. अध्यक्ष यांचे पूर्वपरवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.
मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून
जयंत बारी
वरिष्ठ व्यवस्थापक.
ठिकाण: मुख्य कार्यालय, डहाणू रोड
दिनांक: ३१ – ०८ -२०२६
सभासदांस सुचना
- गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास, वरील सभा त्याच ठिकाणी, त्याच दिवशी अर्ध्या तासानंतर उपरोक्त विषयांसाठी होईल. त्या सभेस गणसंख्येचे बंधन असणार नाही.
- वार्षिक सर्वसाधारण सभेतील विषयांच्या बाबत ज्या सभासदांचे काही प्रश्न वा सूचना असतील तर त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सात दिवस आधी कार्यालयीन वेळेत बँकेच्या मुख्य कार्यालयांत लेखी स्वरूपात कळवावे.
- तपशीलवार अहवालाच्या प्रती, बँकेच्या मुख्य कार्यालयात व शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत.
- वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या वेबसाईट www.dahanujanatabank.com वर प्रसारित केली आहे.
